जय देवी श्री शांते अंबिके निरंजना
शराणांगत गत पायी ऐकावी प्रार्थना ||
कवल ग्राम वासिनी महेश्वरी मनस्विनी
गर्भगृही शिवसंगे नांदिसी नटेश्वरी
विघ्नहर्ती दु:खनाशी तूच वारी आपदा
शराणांगत गत पायी ऐकावी प्रार्थना ||१ ||
तू दुर्गा तू शांता भव भय दुख हारिणी
क्षेत्रपाल पंचदेव प्रिय भक्ता रक्षिणी
मंगलमय वरदायी देई सौख्य संपदा
शराणांगत गत पायी ऐकावी प्रार्थना ||२ ||
हरि हरास शांत करी माया भ्रम नाशवी
जीव शिव रूप भेद वारी सत्य स्वरूप दाखवी
देह बुद्धी चित्त वृत्ती शांतवी चिरंतना
शराणांगत गत पायी ऐकावी प्रार्थना ||३||
विश्वशांती वरदाना दे त्रिलोकपालिनी
कल्याणा करीसी माते सत्य धर्म रक्षुनी
नारायण चरणदास करीतसे वंदना
शराणांगत गत पायी ऐकावी प्रार्थना ||४ ||
इदं न मम


