Practice Vs Riyaz | उपासना आणि साधना

सराव आणि रियाज यातील फरक – practice makes man perfect यानुसार आपल्याला आधी पासून येत असलेली गोष्ट अधिकाधिक चांगली करता येण्यासाठी आपण ती नेमाने परत परत करत असतो. ज्यात रोजची व्यायामाची practice, sports ची practice आपल्या कडे असलेले एखादे skill जसे drawing, painting, किंवा नवीन शिकायला सुरुवात केलेली गोष्ट उदा. driving कौशल्याने, अधिक अचूकतेने साधता येणे यासाठी करायची ती practice. संगीताच्या उपासनेत गायक किंवा वादक ताना घोटणे, पलटे घोटणे आणि आपल्या कलेत अधिकाधिक सफाई आणणे यासाठी करतात ती practice किंवा सराव. रियाज हि त्यानंतर ची पायरी आहे. practice मधे आपल्याला आधी पासून येत असलेली गोष्ट रोजच्या रोज घासून पुसून घासून पुसून लख्ख केली जाते. रियाज हि त्यापुढची पायरी. काहीतरी नवीन गवसण्यासाठी चा शोध म्हणजे रियाज. स्वत:ला विसरण्यासाठी चा क्षण अनुभवण्यासाठी करायचा तो रियाज. उपासना आणि साधना यात जो फरक आहे तोच इथे दिसतो. उपासनेला धार्मिक अधिष्ठान असते, जसे व्रत, वैकल्ये, आपला रोजचा नित्यनेम ज्यात सगुण उपासना बहुतेक करुन केली जाते. पण साधना हि त्यापुढची पायरी. ज्याला आध्यात्मिक बैठक असावी लागते. उपासना जेवढी बळकट तेवढी साधना स्थिर. तसेच practice जेवढी बिनचूकआणि नियमित तेवढा रियाज प्रगल्भ. उपासनेच्या पुढच्या टप्प्यावर उपासकाचा हळू हळू साधक बनायला लागतो. फक्त नित्यानेमापुरता जप किंवा सगुण उपासना न राहता जेव्हा आजच्या भाषेत 24 X 7 नाही तरी शक्य तेवढे अधिकाधिक काळ अनुसंधान साधायला सुरुवात होते तेव्हा साधना सुरू होते. या अनुसंधानात अनेक गोष्टी येतात. गुरुंच्या बोधाचे स्मरण आहेच, शक्य तेवढे अजपाजपाचे भान आहेच त्याबरोबर शक्य तितके unbiased आणि neutral आत्मपरीक्षण हि आहे. उपासनेला धार्मिक अधिष्ठान असल्याने तिथे अहंकार जागृत होण्याची शक्यता थोडी कमी असू शकते तरीही भान जपावेच लागले कारण बहुतेकदा मूळ गाभा बाजूला राहून आपण केलेला खर्च, सजावट याचे प्रदर्शन केले जाते. पण तिथे प्रत्यक्ष ती देवता आपली सेवा स्वीकारत आहे अशी भावना असल्यामुळे आपले वर्तन ती देवता पाहते आहे अशी थोडी तरी सदसद्विवेक बुद्धी जागृत असू शकते. साधनेत मात्र अश्या फसव्या पायऱ्या असतातच. त्यामुळेच साधकावस्थेत सुद्धा सगुण उपासनेला कमी न लेखता त्याचे सुद्धा महत्व जाणून असावे. याचप्रमाणे रियाजाच्या पायरीवर असतानाही practice ला कमी न लेखता practice चे महत्व जाणून ती करतच रहावी लागते. साधना आणि रियाज दोन्ही साधायचे ते शेवटी खऱ्या मी चा शोध घेण्यासाठीच . अनेक वर्ष, जन्मांच्या उपासने नंतर साधकावस्था प्राप्त झाली, तरी अनेक वर्ष, जन्मांच्या साधने नंतर कधीतरी साधना फळाला येते आणि मग who am I चा शोध संपतो तेहि फक्त गुरुकृपेने ! उलट्या क्रमाने जायचे तर यासाठी साधनेची बैठक पक्की हवी त्यासाठी उपासना स्थिर हवी आणि रियाजाच्या बाबतीत तो परिपूर्ण करायचा तर practice नियमित, बिनचूक आणि कसदार हवी.

इदं न मम !

महाकुंभ अलाहाबाद, 2013
महाकुंभ अलाहाबाद, 2013